Home > News > राज ठाकरेंसोबतच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लास वरून ट्रोल करणाऱ्यांवर संदीप देशपांडे भडकले

राज ठाकरेंसोबतच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लास वरून ट्रोल करणाऱ्यांवर संदीप देशपांडे भडकले

राज ठाकरेंसोबतच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लास वरून ट्रोल करणाऱ्यांवर संदीप देशपांडे भडकले
X

काल मनसे नेते संदीप देशपांडे यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसादिवशी संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेत असतानाचा फोटो संदीप देशपांडे यांनी ट्विट केला होता. या ट्विटमध्ये राज ठाकरे यांच्या कडेला असलेल्या टेबलावरच्या ग्लासची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली.

संदीप देशपांडे यांनी जो फोटो शेअर केला आहे त्या फोटो मध्ये ते राज ठाकरे यांना ते वाकून पाया पडत आहेत. आणि यावेळी याठिकाणी कडेला असलेल्या एका टेबलवर एक ग्लास आहे. हा ग्लास कशाचा आहे यावरून समाज माध्यमांवर जोरात चर्चा रंगली आहे.

आता संदीप देशपांडे यांच्या ट्विटवर या संदर्भात अनेक कमेंट्स येत आहेत त्यानंतर आता संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल लोकांचे आभार मानत "कुप मंडुक वृत्तीला पर्याय नसतो, असो आपण शिव्या रुपी दिलेल्या शुभेच्छांचा मी नम्रतापूर्वक स्वीकार करतो" असं म्हंटल आहे. त्यांनी नक्की काय म्हटलं आहे ते पाहूयात..

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार. काल मी टाकलेल्या फोटो वरून काही जणांनी ट्रोल करायचा प्रयत्न ही केला. कुप मंडुक वृत्तीला पर्याय नसतो, असो आपण शिव्या रुपी दिलेल्या शुभेच्छांचा मी नम्रतापूर्वक स्वीकार करतो. धन्यवाद

संदीप देशपांडे यांच्या या ट्विट वरती अनेकांनी रिट्विट करत या ग्लासचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आता लोकांनी या फोटो वरती काय-काय कमेंट केल्या आहेत ते आपण पाहूयात..

हर्षवर्धन पाटील या एका ट्विटर वापरकर्त्याने या संदीप देशपांडे व राज ठाकरे यांचा फोटो आणि त्या फोटोमध्ये दिसणारा ग्लासला हायलाईट करत "जे फक्त उद्धव ठाकरे यांची बदनामी, ट्रोल, विरोध करण्यासाठी फक्त येतात त्यांच्यासाठी" असं म्हणत त्यांनी हा फोटो खाली शेअर केला आहे.

नम्रता ukey शांभरकर या एका ट्विटर वापरकर्त्याने "देशी+ पांड्यासाठी आज विदेशी ! हॅप्पी बर्थडे" असं म्हणत संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांचा फोटो ेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी देखील कडेला टेबलवर दिसणार्‍या क्लासला हायलाईट केलं आहे.

वैभव काठोले या ट्विटर वापरकर्त्याने वरती नम्रता ukey शांभरकर यांनी जो फोटो शेअर केला आहे त्याला रिप्लाय देत बाळासाहेब ठाकरे आणि एका व्यक्तीचा मद्यपान करत असलेला फोटो शेअर केलेला आहे.

योगेश सावंत यांनीदेखील या दोघांचा फोटो शेअर करत "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं लिहिलं आहे आणि या शेअर केलेल्या फोटोमध्ये टेबल वर असलेला ग्लासला हायलाईट केला आहे.

शिल्पा बोडके यांनी ब्लॅक टी..??? असं म्हणत राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा हा फोटो व टेबल वरील ग्लासला हायलाईट करून शेअर केला आहे.

अभिजीत नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने "आता जळणारे म्हणतील कोपर्‍यात टेबलवर ठेवलेल्या ग्लासात दारु आहे." असं म्हणत संदीप देशपांडे यांचं ट्विट रिट्विट केला आहे.

Updated : 27 March 2022 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top