Home > News > आमचं सर्टिफिकेट शोधणारे तुम्ही कोण?; यास्मिन वानखेडेंचं नवाब मालिकांना प्रत्युत्तर 

आमचं सर्टिफिकेट शोधणारे तुम्ही कोण?; यास्मिन वानखेडेंचं नवाब मालिकांना प्रत्युत्तर 

आमचं सर्टिफिकेट शोधणारे तुम्ही कोण?; यास्मिन वानखेडेंचं नवाब मालिकांना प्रत्युत्तर 
X

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध रोज नवनवीन आरोप करत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक कागदपत्रे सुद्धा माध्यमांच्या समोर ठेवत समीन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या याच आरोपाला आता समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. तर आमचं सर्टिफिकेट शोधणारे तुम्ही कोण?, असा प्रश्न सवाल सुद्धा त्यांनी मलीकांना विचरला आहे.

तर, समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचं मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावं सर्टिफिकेट, असं सांगतानाच आमचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचं सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचं सर्टिफिकेट कुणी काढलं आहे का? असा सवाल यास्मिन वानखेडे यांनी केला.

तसेच, मीडिया समोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. आपला वेळ वाया घालवू नका. आम्ही तिथे तुम्हाला उत्तर देऊ, असही यास्मिन वानखेडे म्हणाल्यात. तर ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक आरोप करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Updated : 26 Oct 2021 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top