बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबाद मधील "साक्षी चितलांगे" हिने पटकावले कांस्य पदक
X
औरंगाबाद शहरातील गाडखेडा परिसरामध्ये राहणारी साक्षी चितलांगे हिने पटकावले कांस्य पदक पटकावले आहे .साक्षी चितलांगे हिचे वडील बांधकाम व्यावसायिक असून ते देखील बुद्धिबळ स्पर्धा खेळत असतात. तिला घरातूनच बुद्धिबळ स्पर्धेचे शिक्षणही मिळत आहे. साक्षी ही औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. साक्षी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरासह देश पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धांमध्ये यश मिळवत आहे. तिने अगोदर वेगवेगळ्या स्पर्धा गाजवले आहेत.
नुकत्याच कोईमतुर येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वुमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगे हिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणाहून मातब्बर खेळाडू आलेले असल्यामुळे स्पर्धा चॅलेंजिंग ठरली. स्पर्धेत देशभरातील 14 संघांनी सहभाग नोंदवला होता. तीन इंटरनॅशनल मास्टर व तीन वुमन ग्रँडमास्टर सहभागी होत्या. तरी देखील या स्पर्धेमध्ये साक्षीने 14 पैकी दहा गुण मिळवत दोन कास्य पदकांची कमाई केली.
साक्षी चितलांगे हिने महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधार पदाची धुरा हाती घेतली होती. याच कर्णधार पदामध्ये तिने चांगली कामगिरी बजावली आहे . यासोबतच वुमन इंटरनॅशनल मास्टर आशना मकीजा पाच गुण, वुमन फीडे व मास्टर भाग्यश्री पाटील चार गुण, मृदुल देहाणकर 3.5 गुण, आणि विश्वा शहा एक पॉईंट पाच गुण अशा साथीने संघाला सर्वाधिक कास्यपदक जिंकून देण्यात साक्षीने निर्णायक भूमिका बजावली.






