Home > News > देवेंद्र फडणवीस भाजपमधील वाचाळवीरांना आवर घाला- सलगर

देवेंद्र फडणवीस भाजपमधील वाचाळवीरांना आवर घाला- सलगर

देवेंद्र फडणवीस भाजपमधील वाचाळवीरांना आवर घाला- सलगर
X

मुंबई// भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाबाबत राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे' असं विधान प्रविण दरेकर यांनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.सोबतच त्यांनी भाजपवर टीका करताना भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा अशा वाचाळवीरांना पाठींबा आहे की काय? असा प्रश्न पडत असल्याचे सलगर यांनी म्हटले आहे.

याआधी भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी देखील असल्याचं प्रकारे महिलांना हिनवण्याचे वक्तव्य केले होते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीबद्दल घाणेरडे वक्तव्य करण्यात आले होते,आता राज्याचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनीही अशा पध्दतीने वक्तव्य केले. ही नेमकी कोणती विकृती असं म्हणत यावर भाजप काही कारवाई करणार का?असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपची ही संस्कृतीच असल्याची टीका केली आहे.

दरेकर तुम्हाला राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसवले आहे की, महिलांना हिनवण्यासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान सलगर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना भाजप मधील वाचाळवीरांना लगाम घाला अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा वाचाळवीरांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.

सोबतच त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका केली आहे. भाजपमधील वाचाळवीर अशा पध्दतीने महिलांना हिनवण्याचे काम करत असताना भाजपच्या महिला नेत्या कुठं जाऊन बसल्या आहेत असं सलगर म्हणाल्या.

दरम्यान प्रविण दरेकर यांनी महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना परिणामांसाठी तयार राहावं असं सलगर यांनी म्हटले आहे. यावरून आता भाजप- राष्ट्रवादी मध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated : 14 Sep 2021 5:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top