Home > News > 'ब्लॅक फंगस'मुळे पत्नीचा मृत्यू; पतीने चार मुलांसह केली आत्महत्या

'ब्लॅक फंगस'मुळे पत्नीचा मृत्यू; पतीने चार मुलांसह केली आत्महत्या

ब्लॅक फंगसमुळे पत्नीचा मृत्यू; पतीने चार मुलांसह केली आत्महत्या
X

ब्लॅक फंगसमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने व्यथित झालेल्या निवृत्त सैनिकासह त्याच्या चार मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील एका गावातील आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल हादिमानी (46) आणि त्यांची चार मुले - 19 वर्षांची सौम्या, 16 वर्षांची श्वेता, 11 वर्षांची साक्षी आणि आठ वर्षांची सृजन हादिमानी यांनी शुक्रवारी रात्री विष प्राशन केले. सकाळी घराचा एकही सदस्य बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली,ज्या नंतर घटना समोर आली.

नातेवाईकांनी सांगितले की, हादिमानी यांच्या पत्नीला जुलैमध्ये कोविड-19 नंतर ब्लॅक फंगस झाला होता. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गोपाल खूप दुःखी होते असं त्यांनी सांगितले. तसेच आपल्या आई शिवाय आपण जगू शकत नसल्याचे मुलं नेमही बोलयाचे. आता सर्व घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Updated : 24 Oct 2021 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top