Home > News > VIDEO - डॅशिंग नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे यांना वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर..

VIDEO - डॅशिंग नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे यांना वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर..

VIDEO - डॅशिंग नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे यांना वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर..
X

आपल्या वडिलांच्या प्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. अगदी लहानपणापासून आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला माया करते अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते त्याच प्रमाणे बाप देखील आपल्या लेकरांना काही कमी पडू नये यासाठी दिवस-रात्र घाम गाळत असतो तो देखील आई प्रमाणेच आपल्या मुलांवर प्रेम करत असतो. याच बापासाठी आज अनेक जण कृतज्ञता व्यक्त करतात. राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांनीसुद्धा आज MaxWoman वर 'बाप बापमाणुस असतो' अस म्हणत वडिलांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना त्यांनी वाडीलांसोबतचे अनेक किस्से सांगितले. त्या शाळेत असताना वडिलांसोबत घडलेला एक किस्सा तर फार मजेशीर आहे. तर झालं असं होतं की, ज्यावेळी क्रीडा स्पर्धांमध्ये रुपाली ठोंबरे सहभागी व्हायच्या व त्यात नंबर आला की त्यांचं नाव पेपर मध्ये छापून यायचं. त्यावेळी त्यांचे वडील भावांना ठणकावून सांगायचे बघा माझ्या मुलीचं नाव पेपर मध्ये आला आहे आणि माझी मुलगी हाच माझा मुलगा आहे. इतकंच नाही तर त्यांनी वडिलांसोबत स्कुटर चालवतानाचा सुद्धा एक मजेशीर अनुभव शेअर केला आहे.

रुपाली ठोंबरे या 15 वर्षाच्या असतानाच त्यांचे पितृछत्र हरवले. ज्यांच्या छत्रछायेखाली रुपाली ठोंबरे व त्यांची सहा भावंडे अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले होते. मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारा बाप माणूस जेव्हा असा अचानक निघून हातो त्यावेळी वडिलांची खरी जबाबदारी समजते. रुपाली ठोंबरे यांचे वडील सुद्धा प्रख्यात वकील होते. अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांनी लढवल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अगदी त्यांचा वसा घेऊन रुपाली ठोंबरे देखील वकिली क्षेत्रात आल्या व त्यांनी देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज फादर्स डे दिवशी वाडिलांवीषयी बोलत असताना रूपाली ठोंबरे यांना अश्रू अनावर झाले...

Updated : 19 Jun 2022 6:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top