Home > News > ''उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागाल'' रुपाली ठोंबरे चित्रा वाघ यांच्यावर भडकल्या

''उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागाल'' रुपाली ठोंबरे चित्रा वाघ यांच्यावर भडकल्या

उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागाल रुपाली ठोंबरे चित्रा वाघ यांच्यावर भडकल्या
X

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सध्या समजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका हॉटेलमध्ये नाना पाटोले व एक महिला दिसत आहेत ती महिला पाटोले यांच्या खांद्यावर डोके ठेऊन बसली आहे असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी ट्विटर वर शेअर करत ''काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं'' असा प्रश्न केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर हा व्हिडीओ एडिट केला असून हे भाजपचे कारस्थान असल्याचं नाना पाटोले यांनी म्हंटल आहे. आता चित्र वाघ यांच्या या ट्विट नंतर महाविकास आघाडीतील महिला नेत्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत, ''तुम्ही ब्लु फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याच उत्तर मागाल. अस कुठे करतात का चित्रा ताई? असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडीओ मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील विडिओ ट्विट टाकण्याचं प्रयोजन काय? तो तथाकथित व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे त्याची पडताळणी केली का? त्या महिलेने तुम्हाला कोणतीही तक्रार केली का ? तिला कोणताही त्रास झाला असता आणि त्या महिलेने तुम्हाला तक्रार केली असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र तुम्हाला विरोधी पक्षनेत्याच्या खासगी आयुष्यात सातत्याने ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेले नाही. अशा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे.

Updated : 21 July 2022 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top