Home > News > ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या

''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या

शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी.. रुपाली ठोंबरे भडकल्या
X

भंडाऱ्यात एका ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष सामुहिक बलात्कार प्रकरणानं महाराष्ट्र हादरला. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी महिलेल्या रस्त्याकाठी फेकून देत तिथून पळ काढला. सध्या महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या महिलेवर झालेल्या या अमानुष अत्याचाराप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी शिंदे व फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. बलात्कार करणारा आमच्या माता भगिनींवर बलात्कार करणार, त्यानंतर पोलीस यंत्रणा गुन्हा दाखल करणार पण पुढे काय? सरकार म्हणून तुमची जबाबदारी काय आहे? अजूनही शक्ती कायद्यावर सही झाली नाही. शक्ती कायद्यावर अजून सही का होत नाही? शिंदे व फडणवीस सरकारच्या आया-बहिणी या त्यांच्या आया-बहिणी आहेत आणि जनतेच्या महिला आहेत त्या तुमच्या आया-बहिणी नाही आहेत का? त्यांना कधी न्याय देणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. काय म्हंटल आहे त्यांनी पहा..

Updated : 8 Aug 2022 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top