Home > News > आता नेत्यांच्या घरात जाऊन क्वारंटाईन व्हा ; रुपाली पाटील ठोंबरे संतापल्या...

आता नेत्यांच्या घरात जाऊन क्वारंटाईन व्हा ; रुपाली पाटील ठोंबरे संतापल्या...

आता नेत्यांच्या घरात जाऊन क्वारंटाईन व्हा ; रुपाली पाटील ठोंबरे संतापल्या...
X

राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत आहे. स्मशान भूमीत मोठ्याप्रमाणात मृतदेहांची गर्दी होऊ लागली आहे. लोकांचे जीव किड्यामुंग्यांसारखे चालले आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती इतकी गंभीर असूनही सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर जोरदार टीका करत तुम्हा कुणालाही लोकांच्या जीवाची काळजी नाही, असं चित्र पाहायला मिळतेय. मी स्वतः अशा घाणेरड्या राजकारणात काम करते याची मला लाज वाटते. अशी खंत मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह करत व्यक्त केली.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या,

रेमडेसिवीर लसीवरून जे राजकारण केलं जातंय जनतेच्या जीवाशी जो खेळ मांडलाय हा बघवत नाही. महाराष्ट्रात करोनावर लस बनून सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना लस, बेड, ऑक्सिजन, वेंटिलेटर मिळत नाही. ही शोकांतिका आहे. स्मशानभूमीत गर्दी वाढली आहे. जनतेचा जीव असुविधेमुळे जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेला सुविधा पुरवणं आपलं काम आहे.

जनतेनं एकचं करावं आता करोनाबाधित झाल्यास राजकारण्यांच्या घरात जाऊन क्वारंटाईन व्हा.. मगच या नेत्यांना करोनाचं गांभीर्य कळेल. रेमडेसिवीरचा साठा असतानाही केवळ राजकारणासाठी तुम्ही जनतेच्या जीवाला वेठीस धरलं आहे. असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार टीका केली आहे.

पाहा हा व्हिडिओ...

Updated : 20 April 2021 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top