Home > News > मामाने कौटुंबिक रागातून भाचींना केली मारहाण

मामाने कौटुंबिक रागातून भाचींना केली मारहाण

rupali chakanakr on pune incident about girls

मामाने कौटुंबिक रागातून भाचींना केली मारहाण
X

महिलांच्या सुरक्षिततेबाबत भारतात अनेक कायदे होतात. पण तरीही अनेक घटना समोर येत राहतात. अशीच ए क घटना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात घडली आहे .मामा म्हंटलं की आईनंतर प्रेम करणारा व्यक्ति म्हणून पाहिले जाते. पण याच्या अगदी विरूद्ध ही घटना आहे .


घरात काही कारणांमुळे वाद निर्माण झाला .आणि त्यामुळे मामाने कौटुंबिक रागातून भाचींना भररस्त्यात मारहाण करत विवस्त्र केले, या सगळ्याचे चित्रीकरण केल्याची निंदनीय घटना समोर आली आहे. याप्रकरणी कलम ३५४ व इतर अनुषंगाने गुन्हा दाखल करत आरोपीस अटक झाली आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे यांना याबाबत जलद तपास करुन कारवाईचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या घटनेत पिडित दोन मुलींवर मानसिक आघात झाला आहे यादृष्टीने त्यांचे काउन्सिलिंग व्हावे यासाठी देखील सूचना देण्यात आल्या आहेत.घरगुती वाद विवाद यातून निष्पाप मुलींशी असे गैरवर्तन करणे ही मानसिकता चुकीची आहे.त्यामुळे यामध्ये आरोपींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे .

Updated : 7 Feb 2023 8:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top