Home > News > रुपाली चाकणकरांचे अनुभवाचे बोल,सुप्रिया सुळेंवर निशाणा

रुपाली चाकणकरांचे अनुभवाचे बोल,सुप्रिया सुळेंवर निशाणा

रुपाली चाकणकरांचे अनुभवाचे बोल,सुप्रिया सुळेंवर निशाणा
X


सुप्रिया सुळे यांच्यासोबत इतक्या वर्ष राजकीय प्रवास केल्यांनतर रुपाली चाकणकरांचे अनुभव सुद्धा तितकेच कुतुहलास्पद असू शकतात . पण रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांसोबत जात एक वेगळा निर्णय घेतला . सध्या शरद पवार ,सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे एका बाजूला दिसतात . तर शिंदे फडणवीस सरकारसोबत युती करत अजित पवार राष्ट्रवादीच्या इतर आमदारांसोबत बाहेर पडले . यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सुद्धा आहेत .

रुपाली चाकणकर यांनी शरद पवार याना दैवत मानत असल्याचे म्हंटले आहे. अजित पवार यांच्या सभेतील भाषणात आतापर्यंतची खदखद रुपाली चाकणकर यांनी बोलून दाखवली आहे. पण सध्या त्यांनी एक ट्विट केले आहे . जे जोरदार चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी लिहले आहे, काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात #अनुभवाचे बोल असे त्यांनी लिहले आहे .

या फोटोमध्ये आपल्याला राहुल गांधी आणि राष्ट्रवादीची राष्ट्रीय युवती काँग्रेसची अध्यक्ष सोनिया दुहान दिसत आहेत .या दोघांमागे सुप्रिया सुळे या सुद्धा दिसत आहेत .यावर रुपाली चाकणकर यांनी वरील ट्विट केले आहे. रुपाली चाकणकर यांना असेच अनुभव आतापर्यंत आले असतील का? हा प्रश्न पडत आहे.

Updated : 9 July 2023 9:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top