Home > News > औरंगाबादमध्ये दरोडा, दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये दरोडा, दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये दरोडा, दोन महिलांवर सामूहिक बलात्कार
X

औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रात्री 11 वाजेच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा दाख दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी घरातील ...चोरीला गेलं आहे.-

कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. विशेष म्हणजे यातील एक पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे.
Updated : 20 Oct 2021 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top