Latest News
Home > News > भारतातील अनेक मोठे सेलिब्रिटी युकेमध्ये अडकले

भारतातील अनेक मोठे सेलिब्रिटी युकेमध्ये अडकले

भारतातील अनेक मोठे सेलिब्रिटी युकेमध्ये अडकले
X

कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे ओढवलेल्या संकटाने युकेमध्ये सक्तीचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे भारतातील अनेक मोठे सेलिब्रिटी युकेमध्ये अडकल्याचं वृत्त समोर येत आहे. यात अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आफताब शिवदासानी यांच्यासह रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकर या कलाकारांचा समावेश आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातही लॉकडाऊन करण्यात आलं. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. त्याचप्रमाणे कला क्षेत्रातील देखिल कामकाज पुर्णपणे ठप्प होते. मात्र लॉकडाऊनच्या नियमांध्ये शिथीलता मिळताच या कामांना पुन्हा वेग आला. चित्रीकरणाला देखिल सुरूवात झाली. यामुळं शूटिंच्या निमित्तानं परदेशात गेलेले अनेक सेलिब्रिटी तिथं अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. तर काही सेलिब्रिटी सुखरूप मायदेशी परतले आहेत.

Updated : 2020-12-24T20:25:42+05:30
Next Story
Share it
Top