Home > News > Rihanna ने Anant Ambani आणि Radhika च्या लग्नपूर्व समारंभात ग्लॅमरचा तडका दिला!

Rihanna ने Anant Ambani आणि Radhika च्या लग्नपूर्व समारंभात ग्लॅमरचा तडका दिला!

Rihanna ने Anant  Ambani आणि Radhika च्या लग्नपूर्व समारंभात ग्लॅमरचा तडका दिला!
X

2021 या वर्षात शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलं होत. अन्नदात्या शेतकऱ्याचे हे आंदोलन देशभरात तर पोहचलेच होते, त्याचप्रमाणात देशा बाहेर देखील याचे पडसाद उमटतांना तुम्ही पहिले असतील. दरम्यान बार्बेडियन पॉप गायक रिहाना हीच ट्वीट या आंदोलनात चर्चेचा विषय बनलं होत. "आपण याबद्दल का बोलत नाही?! #शेतकरी आंदोलन शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आशा प्रकारचं ट्वीट रिहानाने केलं होत. हीच प्रसिद्ध पॉप स्टार रिहाना भारतात पहिल्यांदाच आली आणि अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नपूर्व समारोहाला पहिल्याच दिवशी आपल्या दमदार परफॉर्मन्सने वातावरण हादरवून टाकले.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी MUKESH AMBANI यांच्या धाकटे पुत्र अनंत आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नपूर्व समारंभात थाट आणि ऐश दिसून येत आहे. या समारंभात रिहानाचा परफॉर्मन्स आणि एक अद्भुत ड्रोन शो यांचा समावेश आहे. या भव्य समारंभात सहभागी होण्यासाठी जगभरातून अनेक मान्यवर लोक जामनगर, गुजरातमध्ये जमले आहेत. यात बॉलीवूडमधील कलाकार आणि प्रसिद्ध खेळाडूंचाही समावेश आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी NITA AMBANI यांनी आपल्या मुलाच्या लग्नसमारोहाला कला आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दलच्या आपल्या आवडीचा पुनरुच्चार केला. त्यांनी जामनगर, गुजरातमध्ये त्यांनी गुजराती उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. जामनगर हे त्यांच्या कुटुंबाचा वारसा आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात झालेले ठिकाण आहे. त्यांनी या प्रदेशाला एक समृद्ध समुदाय बनवण्यात आपले योगदान दिले आहे.

प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने SAINA NEHAWAL तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पहिल्या दिवसाचा रोमांचक कार्यक्रम शेअर केला. यामध्ये उत्सवात्मक स्वागत समारंभ आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा रात्रीचा कार्यक्रम होता. या समारोहाला "दि कन्झर्वेटरीमध्ये एन इव्हनिंग इन एव्हर्लॅण्ड" असे नाव देण्यात आले होते. "एलिगंट कॉकटेल" हा या कार्यक्रमाचा ड्रेस कोड होता. यानंतर मनमोहक परफॉर्मन्स आणि ड्रोन शोने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

अनंत आणि राधिका यांच्या प्री वेड्डिंग कार्यक्रमात अनेक देशातील दिग्गज जमले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रिहाना हिरव्या रंगाच्या डिझायनर बॉडीकॉन आणि चमकदार गाऊनमध्ये दिसत आहे. तिने रंगमंचावर आपल्या गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स देत उपस्थितांशी संवाद साधला.

रिहानाने तिच्या "वर्क", "रूड बॉय", "पोअर इट अप", "डायमंड्स" आणि "वाइल्ड थिंग्स" सारख्या सुपरहिट गाण्यांवर उपस्थितांना थीरकावले. तिने अंबानी परिवाराचे आभार मानले आणि या जोडप्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अशा प्रकारे, रिहानाच्या परफॉर्मन्सने अनंत आणि राधिकाच्या लग्नपूर्व समारंभात ग्लॅमरचा तडका दिला आणि हा कार्यक्रम अविस्मरणीय बनवला.

Updated : 2 March 2024 6:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top