Home > News > महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या विवाह बंधनात...

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या विवाह बंधनात...

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या विवाह बंधनात...
X

राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. काही जवळच्या आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

कोरोनाचा लॉकडाउन संपल्यानंतर लग्न सराईला जोरदार सुरूवात झाली आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री, आमदार आणि राजकारण्यांची मुलं देखील विवाह बंधनात अडकत आहेत. राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ.जयश्री थोरात हिचा विवाहसोहळा देखील नुकताच पार पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही जवळच्या आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.जयश्री ही डॉक्टर असून मुंबईमध्ये टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये काम करते. टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे पेशंट असतात. या पेशंटची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत कमी झालेली असते. अशा ठिकाणी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची खूप शक्यता असते. धोका असतो.. तेथे डॉ. जयश्री आरोग्य सेवा देण्याचे काम करते. बाळासाहेब थोरात यांचा मोठा मुलगा देखील अमेरिकेत डॉक्टर आहे. तर बाळासाहेबांनी आपल्या डॉक्टर मुलीसाठी निवडलेला पती देखील डॉक्टर आहे. जयश्रीचा विवाह डॉ. हसमुख यांच्याशी झाला आहे.

Updated : 22 Jan 2021 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top