Home > News > अनाथांची माय हरपली..सिंधुताई सपकाळ यांचे निधन..

अनाथांची माय हरपली..सिंधुताई सपकाळ यांचे निधन..

अनाथांची माय हरपली..सिंधुताई सपकाळ यांचे निधन..
X

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhu Tai Sapkal) यांचे काही वेळापूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. आज रात्री 8 च्या सुमारास निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. आज अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगभर घेतली गेली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी आजपर्यंत अनेक खडतर प्रवास केला होता. त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षांच्या होत्या.

Updated : 4 Jan 2022 5:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top