Home > News > Reliance Retail चा Just Dialवर ताबा; 40.98% टक्के हिस्सा अंबानींच्या मालकीचा

Reliance Retail चा Just Dialवर ताबा; 40.98% टक्के हिस्सा अंबानींच्या मालकीचा

Reliance Retail चा Just Dialवर ताबा;  40.98%  टक्के हिस्सा अंबानींच्या मालकीचा
X

रिलायन्स समूहातील किरकोळ व्यापार क्षेत्रातील कंपनी असलेल्या Reliance Retail Ventures ने आज Just Dial या डेटाबेस कंपनीतील मालकी हिस्सा खरेदी केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकल सर्च इंजिन समजल्या जाणाऱ्या Just Dial च्या मालकीवर आता Reliance Retail Ventures कंपनीचा अधिकार असणार आहे. कारण Reliance Industries Group चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी Just Dial मधील 40.98% टक्के खरेदी केली आहे.

Just Dial ने गुरुवारी माहिती दिली की, त्याच्या मंडळाने कंपनीचे 2.12 कोटींचे शेअर्स Reliance Retail Ventures देण्यास मंजुरी दिली आहे. शेअर्सचे हे वाटप 1,022.25 रुपये प्रति शेअरनुसार केले गेले आहे. 10 रुपयांच्या फेस वैल्यू असलेल्या या शेअर्सवर कंपनीला 1,012.25 रुपयांचा प्रीमियम प्राप्त झाला आहे. आणि याच प्राधान्य तत्त्वावर खाजगी प्लेसमेंटद्वारे शेअर्स वाटप करण्यात आले आहे.

Just Dialचे शेअर वाटपाच्या व्यवहारानंतर Reliance Retail कडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ज्यात Just Dial च्या एकूण शेअरमध्ये Reliance Retail Ventures चा हिस्सा 40.98% एवढा असेल. त्यामुळे Just Dial Limited चे ​​संपूर्ण नियंत्रण आता मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Reliance Industries Group असेल.

Updated : 3 Sep 2021 3:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top