Home > News > सर्वसामान्य मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी तूर्तास ठप्पच

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी तूर्तास ठप्पच

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी तूर्तास ठप्पच
X

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेल्या नियमित मेल-एक्सप्रेस गाड्या आणि लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतलेला आहे. त्यामुळे सामान्यांसाठी लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना सध्या फक्स्टत बेस्ट, एसटी बस आणि खासगी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे.

दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे नियमित वेळापत्रक देखील 12 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे 1 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान ज्या लोकांनी रेल्वे तिकिटांचे आरक्षण केले होते त्यांना सर्व पैसे परत केले जाणार आहेत. दरम्यान लॉकडाउनच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली विशेष रेल्वे सेवा यापुढेही सुरूच राहणार आहे.

Updated : 26 Jun 2020 6:39 AM GMT
Next Story
Share it
Top