Home > News > 12 तासात मुंबईत कुठे किती पावसाची नोंद वाचा एका क्लिकवर

12 तासात मुंबईत कुठे किती पावसाची नोंद वाचा एका क्लिकवर

12 तासात मुंबईत कुठे किती पावसाची नोंद वाचा एका क्लिकवर
X

शुक्रवारपासून मुंबई व कोकणासह राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मात्र आज, रविवारी मात्र पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदवला आहे. दरम्यान लोअर परेल, दादर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मुलुंड, भांडुप या ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले. मुंबईत मुसळधार पावसामुळे हिंदमाता, मिलन सबवे, किंग्ज सर्कल, कुर्ला, एस.व्ही. रोड या भागात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, रविवारी मुंबईत अधूनमधून मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत कुठे किती पाऊस?

महानगर पालिकेच्या नोंदीनुसार शनिवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत सांताक्रूझमध्ये १३२.२ मिमी तर कुलाबा येथे ७४.६ मिमी पावसाची नोंद झाली. शहरांमध्ये सायंकाळी ६पर्यंत ८१.९१, पूर्व उपनगरांमध्ये ८२.६९ तर पश्चिम उपनगरांमध्ये ८८.६७ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी शनिवारी सायं. ७.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये २०० मिमी अर्थात २० सेंटीमीटरहून अधिक पाऊस झाला.

बोरवली अग्निशमन दल, दौलत नगर, कांदिवली अग्निशमन दल केंद्र येथे तसेच ठाण्यात काही ठिकाणी गेल्या २४ तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, मुलुंड, मालवणी, गवाणपाडा, दिंडोशी, धारावी येथे १०० मिमीहून अधिक पाऊस झाला. ठाणे नौपाडा येथे २२२.६ मिमी इतका सर्वाधिक पाऊस नोंदला गेला.

Updated : 5 July 2020 1:39 AM GMT
Next Story
Share it
Top