Home > News > कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत गावकऱ्यांचं गैरवर्तन

कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत गावकऱ्यांचं गैरवर्तन

कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत गावकऱ्यांचं गैरवर्तन
X

कोरोना काळात महिला फ्रंटलाइनवर काम करत आहेत. अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करताना पाहायला मिळतात. मात्र असंच काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक प्रकार घडला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील अड़खल जुईकर मोहल्ला येथे कोरोना सर्व्हेचे काम थांबवा म्हणत गावातील लोकांनी आरोग्य सेविका कर्मचाऱ्याला घेराव घातला आणि या महिला कर्मचाऱ्याच्या गाडीची चावी देखील हिसकून घेतली गेली. तसेच पुरुष मंडळीने दमदाटी केली. हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील 50 ते 60 लोकांनी घेराव घालत महिला कर्मचाऱ्याला दमदाटी करत गावातून हाकलून लावलं. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले चिंतेचे विषय होत आहेत.

दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांबाबतीत असे प्रकार वारंवार घडल्यास कामादरम्यान त्यांचं खच्चीकरण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Updated : 1 Aug 2020 12:50 AM GMT
Next Story
Share it
Top