पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात ग्रामस्थांना 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातली दुर्मिश शिल्प सापडले आहेत. त्यामुळे हे गाव सध्या चर्चेत आहे. या सापडलेल्या मुर्त्या 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील असल्याचे बोललं जातं आहे. या मुर्त्यामध्ये 5 मुखी गाय आणि काही दुर्मिळ सुबक शिल्पही सापडलं आहे. या मुर्त्या सहाव्या ते सातव्या दशकातील असल्याचं बोललं जात आहे. या भागात खोदकाम केले तर दडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू समोर येतील. मंदिरांची रचना करताना करण्यात आलेले कोरीव कामं हे सर्वाना पाहता येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासाकडे केली. या गावात एकूण 3 तळी आहेत. अनेक दशकांपासून या तळ्यातील पाणी आटलेलं नाही, असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
या तळव्यामध्ये अजून काही पुरातन मुर्त्या असतील सरकारच्या पुरातत्व खात्याने खोदकाम करावं, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. जेणेकरुन काही दडलेल्या ऐतिहासिक वस्तू समोर येतील आणि मध्ययुगीन काळातील इतिहास सर्वाना कळेल. ग्रामदान मंडळ हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावं अशी मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत.