Home > News > संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, नराधमाने तीचा ओठ दाताने तोडला

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, नराधमाने तीचा ओठ दाताने तोडला

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, नराधमाने तीचा ओठ दाताने तोडला
X

औरंगाबादमध्ये अंत्यत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तिने रोखण्याचा प्रयत्न केला असता नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला.

यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 17 Oct 2020 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top