Home > News > दीपिकाच्या मुलाखतीत अचानक रणवीर आला आणि...

दीपिकाच्या मुलाखतीत अचानक रणवीर आला आणि...

दीपिकाच्या मुलाखतीत अचानक रणवीर आला आणि...
X

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसली. दरम्यान, सोशल मीडियावर दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये

टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीचा पती रणवीर सिंग तिला सरप्राईज देण्यासाठी आला होता. मुलाखत चालू असताना रणवीर आला आणि मग त्यानंतर काय धम्माल झाली पहा..

रणवीरने दीपिकाला किस केले..

या व्हिडिओमध्ये दीपिकाला तिच्या रणवीर सिंगसोबतच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर रणवीर अचानक स्टेजवर पोहोचतो खरंतर दीपिका साठी हे सर्व आश्चर्यचकित करणारे सरप्राईज असते. रणवीरला पाहताच दीपिकाच्या चेहऱ्यावर मोठं हसू येतं. त्यानंतर रणवीर दीपिकाचे चुंबन घेत तिला शुभ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

लग्नाच्या प्रश्नावर रणवीर सिंह म्हणाला..

लग्नाच्या प्रश्नावर ते दोघेही सांगतात की, त्यांच्या लग्नाला चार-साडेचार वर्षे झाली आहेत. पण ते 10 ते 11 वर्षांपासून एकत्र आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना दोघे एकमेकांचा हात धरताना दिसले.

Updated : 13 May 2023 1:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top