Home > News > राणा दाम्पत्याला करावी लागणार पुन्हा जेलची वारी?

राणा दाम्पत्याला करावी लागणार पुन्हा जेलची वारी?

जामीन देताना कोर्टाने घातलेल्या अटीचे नवनीत राणा व रवी राणा यांनी उल्लंघन केले असल्यास जमीन अर्ज रद्द होऊ शकतो..

राणा दाम्पत्याला करावी लागणार पुन्हा जेलची वारी?
X

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. मात्र हा जामीन मंजूर करत असताना त्यांना काही अटी-शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे त्यांना सशर्त जामीन देण्यात आला होता. हा जामीन देताना कोर्टानं घातलेल्या अटीचे नवनीत राणा यांनी उल्लंघन केले असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या Adv. हेमा पिंपळे यांनी म्हंटले आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना घातलेल्या तीन महत्त्वाच्या अटींमध्ये राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आज नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणा दाम्पत्यानं माध्यमांशी संवाद साधून कोर्टाने घातलेल्या अटींचा भंग केला आहे. हा न्यायालयाचा अवमान असून त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी Adv. हेमा पिंपळे यांनी केली आहे.

राणा दाम्पत्यानं कोर्टानं घातलेल्या अटींचं उल्लंघन करून कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सुद्धा हेमा पिंपळे यांनी म्हंटले आहे. आता या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल व या चौकशीत आक्षेपार्ह काही बाबी आणि वक्तव्य आढळली तर त्यांचा जामीन अर्ज रद्द देखील होऊ शकतो.

Updated : 8 May 2022 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top