Home > News > राणा कुटुंबीयांनी मातोश्रीवर येऊन दाखवावं, शिवसैनिक भडकले

राणा कुटुंबीयांनी मातोश्रीवर येऊन दाखवावं, शिवसैनिक भडकले

राणा कुटुंबीयांनी मातोश्रीवर येऊन दाखवावं, शिवसैनिक भडकले
X

सध्या देशामध्ये भुंग्यांचा राजकारण चांगलंच तापलंय. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. शुक्रवारी राणा दाम्पत्य हे मुंबईत दाखल झालं आहे आणि शिवसैनिकांनी मुंबईतल्या नाक्या नाक्यावर राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.

नवनीत राणा यांना अडविण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईच्या टोल नाक्यांवर देखील फिल्डिंग लावली होती . कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणा यांना मुंबईत प्रवेश करू द्यायचा नाही असा चंगच शिवसैनिकांनी बांधला होता मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर देखील शिवसैनिक जमा झाले होते परंतु नवनीत राणा या मुंबईत दाखल झाल्याचं कळताच शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठलं. राणा दांपत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावंच असा धमकी वजा इशाराच शिवसैनिक देताना पाहायला मिळत आहेत.

Updated : 22 April 2022 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top