Home > News > ''संजय राऊत उद्धव व रश्मी ठाकरेंना अश्लील भाषेत..'' रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट!

''संजय राऊत उद्धव व रश्मी ठाकरेंना अश्लील भाषेत..'' रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट!

संजय राऊत उद्धव व रश्मी ठाकरेंना अश्लील भाषेत.. रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट!
X

राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यात मागच्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष जोरदार सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वाद दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जस जसे हा वाद वेगेवेगळी वळणे घेत आहे तस-तस ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांकडून देखील एकमेकांवर जोरदार टीका-टिप्पणी, उत्तर-प्रतिउत्तर सुरू आहे. दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे याने माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली होती असा धक्कादायक आरोप केला.

संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपानंतर आता शिंदे गटाचे नेते देखील राऊत यांच्यावर जोरदार तुटून पडले आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्या निष्ठेची विस्टा कधीच झाली आहे. संजय राऊत हे खरे शिवसैनिक नाहीत उसने अवसान आणून आपण शिवसेना वाचवत आहोत असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला ते फसवत आहेत अशी टीका केली.

रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांना अश्लील भाषेत शिव्या दिल्या..

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिव्या दिल्या होत्या. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड केली. त्यांना त्या पदावर बसवलं तेव्हा संजय राऊत यांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिव्या दिल्या होत्या. हे संजय राऊत विसरले असतील पण मी विसरलेलो नाही. आपण मुळात शिवसैनिकच नाहीत ते तुम्हालाही माहित आहे आणि मलाही. असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला..

Updated : 24 Feb 2023 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top