Home > News > राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती!

राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती!

राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती!
X

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गुरुवारी पहाटे गोळीबार झाला. या घटनेनंतर अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी सलमान खानला पाठिंबा दर्शवला आहे. यात अभिनेत्री राखी सावंतचाही समावेश आहे.

राखीने एका व्हिडिओद्वारे बिष्णोई गँगला विनंती केली आहे की त्यांनी सलमान खानवर हल्ला करू नये. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये राखी म्हणते, "मी तुमच्यासमोर हात जोडते आणि विनंती करते की तुम्ही हे करू नका. सलमान खानने अनेकांचे प्राण वाचवले आहेत आणि अनेक गरीब लोकांची मदत केली आहे. बिष्णोई गँगला या हल्ल्याने काय मिळणार?"

राखी पुढे म्हणते, "तुम्हाला माहित आहे का ते किती मोठे देव आहेत? माझी आई खूप आजारी होती तेव्हा त्यांनी माझ्या आईचे ऑपरेशन करून तिला वाचवले. तसेच, कोरोना काळात जेव्हा मला पैशांची गरज होती तेव्हा त्यांनी माझी मदत केली. असा चांगला माणूस कुठे मिळणार? मी फक्त विनंती करू शकते. मी मोठ्या आवाजात बोलत नाही."

"त्यांनी स्वतः लग्न केले नाही पण इतरांना मदत केली. ते साधे जीवन जगतात. त्यांना तसेच जगू द्या. बिष्णोई गँग, मी तुम्हाला विनंती करते की त्यांना जगू द्या," असे राखी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Updated : 16 April 2024 7:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top