Home > News > Marathi Big Boss मध्ये राखी सावंतची होणार एन्ट्री : मॅक्सवुमनला राखीने दिली माहिती

Marathi Big Boss मध्ये राखी सावंतची होणार एन्ट्री : मॅक्सवुमनला राखीने दिली माहिती

Marathi Big Boss मध्ये राखी सावंतची होणार एन्ट्री : मॅक्सवुमनला राखीने दिली माहिती
X

आयटम गर्ल राखी सावंत सतत कोणत्या-कोणत्या चर्चेत पाहायला मिळते. राखी सावंत स्वतःचं एक टीआरपीचा विषय आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमं असो किंवा राजकारण राखीच्या बातम्या आणि निवडणुकांपूर्वी राजकारणात तिच्या नावाचा उल्लेख प्रकर्षाने घेतल्याचं पाहायला मिळतंय.

नवज्योत सिधू पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत आहे. असं विधान आपच्या राघव चड्डा यांनी केल्यानंतर प्रसारमाध्यमांवर राखी सावंतच्या बातम्या, मुलाखती झळकत असतानाच उत्तर प्रदेशच्या विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी राखीच्या कपड्यांवर केलेलं वादग्रस्त विधान राखीला पुन्हा एकदा जोरदार चर्चेत घेऊन आलं.

परंतु आता चर्चा होणार आहे ती मराठी बिग बॉसमध्ये राखी सावंतच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची... कारण खुद्द राखी सावंतने मॅक्स वुमनशी बोलताना सांगितलं की, मी येत्या दोन-तीन दिवसात म्हणजेच येणाऱ्या आठवड्यात मराठी बिग बॉस मध्ये दिसणार आहे. कलर्स मराठी मला मराठी बिग बॉसमध्ये( Marathi Big Boss) बोलवत आहे. त्यामुळे मी लवकरच बिग बॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

राजकारण आणि त्यांच्यावर होणारी टिका-टिप्पणी यांसदर्भात राखी सावंत यांच्याशी मुलाखतीसाठी संपर्क साधला असता राखीने सांगितलं की, मला सध्या राजकारणावर काही बोलायचं नाही. मी मराठी बिग बॉस मध्ये जाणार आहे अशी माहिती तिने दिली. तसेच बिग बॉस मधून आल्यानंतर मी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलणार आहे. असं देखील राखीने सांगितलं आहे.

टीआरपी असलेल्या राखीने हिंदी बिग बॉसमध्ये जसा धुमाकूळ घातला होता तसाच धुमाकूळ आता मराठी बिग बॉस मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता राखी कधी मराठी बॉस मध्ये दिसेल याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Updated : 22 Sep 2021 2:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top