Home > News > rakhi sawant ; राखी सावंतने नवऱ्या सोबत धरलेला ठेका जोरदार चर्चेत..

rakhi sawant ; राखी सावंतने नवऱ्या सोबत धरलेला ठेका जोरदार चर्चेत..

rakhi sawant ; राखी सावंतने नवऱ्या सोबत धरलेला ठेका जोरदार चर्चेत..
X

नुकत्याच चर्चेत असलेल्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील गाणी सध्या मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील गाणी तसेच डायलॉग अनेक जण वेगवेगळ्या माध्यमांवर शेअर करत आहेत. या चित्रपटातील 'ओ अंटवा' (Oo Antava Oo Oo Antava) या गाण्यावर राखी सावंत यांनीदेखील ठेका धरला आहे.

राखी सावंत मागील काही दिवसांपासून तिचा नवरा कोण आहे यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. राखी सावंत यांनी माध्यमांसमोर तसेच त्या सहभागी झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये त्यांचे लग्न झाला असून त्यांचा नवरा परदेशात राहतो असं सांगितलं होतं. त्यामुळे राखी सावंतच्या चाहत्यांना तिचा नवरा कोण आहे याची उत्सुकता लागली होती. आणि त्यानंतर बिग बॉस मध्येच त्यांनी त्यांच्या नवऱ्याला बोलवलं होतं. त्यानंतर त्यांच्या सोबत त्यांच्या नवऱ्याची सुद्धा चर्चा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होती.

राखी सावंत स्वतः समाजमाध्यमांवर फार ॲक्टिव्ह असतात. त्या त्यांचे फोटो व व्हिडीओज समाज माध्यमांवर शेअर करत असतात. आता राखी सावंत यांनी पुष्पा या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात चर्चेत आहे.

राखी सावंत यांनी घागरा ड्रेस घालून पुष्पा चित्रपटातील ओ अंटवा या गाण्यावर डान्स केला आहे. डान्समध्ये त्यांच्यासोबत त्यांचा नवरा देखील ठेका धरताना दिसतो आहे.

Updated : 2022-01-30T09:39:32+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top