Home > News > #RajKundraArrest : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक

#RajKundraArrest : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक

#RajKundraArrest  : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक
X

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे राज कुंद्रा यांना मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्रा हे एक प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली आहे. अश्लील फिल्म बनवण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. या अश्लील फिल्म तयार करुन त्या विविध एप्सवर दाखवण्याऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पर्दाफाश केला होता. याच प्रकरणाशी राज कुंद्रा यांचा संबंध असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

राज कुंद्रा यांना पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे 6 ते 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. Porn फिल्म्स तयार करुन त्या मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करायच्या, असे काम करणाऱ्या एका रॅकेटचा मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी त्यावेळी एका अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता राज कुंद्रा यांनाही अटक करण्यात आली आहे. चार महिनन्यांपूर्वी Porn फिल्म प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

हे प्रकरण उघडकीस आले तेव्हापासून मुंबई पोलिसांनी फिल्म बनवणाऱ्या अनेक जणांची चौकशी केली होती. त्यानंतर सोमवारी राज कुंद्रा यांची चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबईथील मढ इथे एका बंगल्यावर धाड टाकली होती. तिथे पॉर्न फिल्मचे शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. यामध्ये दोन अभिनेत्यांचा समावेश होता. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या दोन तरुणी तिथे आढळल्या होत्या. पण त्या अश्लील फिल्म बनवणाऱ्या या टोळीच्या जाळ्यात अडकल्या होत्या, अशी माहिती समोर आली होती.

Updated : 20 July 2021 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top