Home > News > ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी मार खाईल;महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज ठाकरे गरजले

ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी मार खाईल;महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज ठाकरे गरजले

ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी मार खाईल;महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज ठाकरे गरजले
X

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात हल्लाबोल चढवला आहे. "ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत." असं राज ठाकरे म्हणाले.

यांची हिम्मत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल." असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Updated : 31 Aug 2021 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top