Home > News > तुमच्या भागात पावसाची परिस्तिथी काय पहा एका मिनिटात...

तुमच्या भागात पावसाची परिस्तिथी काय पहा एका मिनिटात...

तुमच्या भागात पावसाची परिस्तिथी काय पहा एका मिनिटात...
X

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली मात्र मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतलेली दिसत आहे. काही भागांमध्ये पावसाने जरी उसंत घेतली असली तरी कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. एकीकडे हि परिस्थिती असताना दुसरीकडे राज्यात सर्वदूर पाऊस झाला असला तरी काही भाग मात्र याला अपवाद आहे. काही ठिकाणी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. आता जर पुढील 24 तासांचा हवामानाचा अंदाज पाहिला तर राज्यातील कोकणपट्ट्यास ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्यातील घाटमात्यांवरील भागातही पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील तर मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे...

Updated : 3 Aug 2023 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top