Home > News > पुढील तीन दिवस धुवादार पाऊस...

पुढील तीन दिवस धुवादार पाऊस...

पुढील तीन दिवस धुवादार पाऊस...
X

राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड आणि कोकण विभागात मुसळधार पाऊस सुरु असून पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी दडी मारून बसलेला पाऊस आता जोरदार बरसू लागला आहे. हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी रायगड, पालघर, पुणे, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांसाठी राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Updated : 22 July 2023 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top