- कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक...
- प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या..?
- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..

रायगड करांना मिळणार 34 एकर जागेतील सुसज्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
X
अलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी हे महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.
या बाबत बोलताना पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “रायगड जिल्ह्यात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्यामुळे मोठी अडचण होत आहे. वैद्यकीय महाविद्यालय असावे असे रायगडकरांचे बऱ्याच वर्षांपासूनचे स्वप्न होते. सुनील तटकरे रायगडचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळवली होती. परंतू, राजकीय वादात ते बारगळले होते. पण आता त्यासाठी अलिबाग जवळच्या खानाव येथे ३४ एकर जागा देखील उपलब्ध झाली आहे.” आदिती तटकरे यांनी सांगीतलं.