Home > News > Tokyo Olympics: चीनच्या खेळाडूला पराभूत करून पीव्ही सिंधूने इतिहास रचला

Tokyo Olympics: चीनच्या खेळाडूला पराभूत करून पीव्ही सिंधूने इतिहास रचला

Tokyo Olympics: चीनच्या खेळाडूला पराभूत करून पीव्ही सिंधूने इतिहास रचला
X

पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या ही बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव केला.

26 वर्षीय सिंधूचे ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यासह सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी दुसरी भारतीय बनली आहे. त्याच्या आधी कुस्तीपटू सुशील कुमारने ही अनोखी कामगिरी केली होती. सुशीलने बीजिंग ऑलिम्पिक (2008) मध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिक (2012) मध्ये रौप्य जिंकले होते.

Updated : 1 Aug 2021 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top