Home > News > पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर, नागपूर तिसऱ्या स्थानी

पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर, नागपूर तिसऱ्या स्थानी

पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर, नागपूर तिसऱ्या स्थानी
X

लॉकडाऊन काळात पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असल्याचं समोर आले आहे. त्यात राज्याची उपराजधानी नागपूर (nagpur) आणि झपाट्याने वाढणाऱ्या पुणे (pune) शहरात सुद्धा गुगलवर पॉर्न व्हिडिओ सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. एवढच नाही तर, पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर लागत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आले आहे.

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पॉर्न व्हिडिओ सर्च करण्याचे प्रमाण चारपटाने वाढले आहे. ज्यामुळे राज्यात पॉर्न सर्चिंगमध्ये नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक चा (nashik) नंबर लागतोय. विशेष म्हणजे पॉर्न व्हिडिओ सर्च करणाऱ्यांमध्ये शाळकरी-महाविद्यालयीन तरुण,तरुणी,महिला यांचा अधिक समावेश असल्याचे सुद्धा समोर आले आहे.

देशातील ८५७ पॉर्न साईटवर गेल्या चार-पाच बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. साईटवर बंदी घातल्यावर लगेच वेबसाईटच्या नावात बदल करून पुन्हा डोमेन घेऊन ह्या साईट सुरु होतात. तसेच गुगल प्ले स्टोरवर सुद्धा अशा अनेक ॲप्स आहेत, ज्यावर पॉर्न व्हिडिओ सहज उपलब्ध होतात.

Updated : 27 July 2021 10:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top