Home > News > पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसची कौतुकास्पद कामगिरी

पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसची कौतुकास्पद कामगिरी

पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसची कौतुकास्पद कामगिरी
X

पोलीस आणि त्यांच्या कामाबद्दल नेहमीच कौतुक केले जाते. आपतकालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता पोलीस पाहतात . ट्राफिक पोलीस सुद्धा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी नेहमी तत्पर असतात. पण पुण्यातील सहकारनगर येथील एका ठिकाणी कर्तव्य बजावत असताना ट्राफिक महिला पोलीस साबळे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

पुण्यात प्रचंड पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. सहकार नगर डिव्हिजन मधील साबळे या महिला पोलीसने प्रामाणिक राहून कौतुकास्पद कामगिरी केली आहे .सहकार नगर वाहतूक शाखा डिव्हिजन मध्ये त्या काम करत असताना ,जबाबदारी काय असते याची जाणीव त्यांनी त्यांच्या कामातून दाखवली आहे . याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे.

रस्त्यावर गाड्या जात असताना ड्रेनेजलाईन मधून पाणी बाहेर येत होते.त्याचे झाकण बाजूला केलेले असताना त्यातून पाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे झाडाच्या फांदीने पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांनी जी कामगिरी केली आहे,त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत .त्याचबरोबर महापालिका आणि ठेकेदार यांच्या जबाबदारी बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

Updated : 17 Sep 2022 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top