Home > News > PUBGI हत्याकांड; आईचा खून करून तीन दिवस मृतदेह लपवून ठेवला..

PUBGI हत्याकांड; आईचा खून करून तीन दिवस मृतदेह लपवून ठेवला..

PUBGI हत्याकांड; आईचा खून करून तीन दिवस मृतदेह लपवून ठेवला..
X

लखनऊमधील PUBG हत्याकांडात आईची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाने रात्री 2 वाजता आईला गोळ्या घातल्याची कबुली दिली, मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत ती जिवंत होती, त्रास सहन करत होती. मरणाची वाट पाहत तो पुन्हा पुन्हा दरवाजा उघडायचा आणि आईला होत असलेला त्रास पाहून पुन्हा त्या खोलीचे कुलूप लावायचा.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ADCP), काशिम अब्दी यांनी या घटनेविषयी सांगितले की, साधना सिंगची हत्या करणाऱ्या त्यांच्या 16 वर्षीय मुलाची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यात त्याने सांगितले की, शनिवार, ४ जून रोजी रात्री तो आईसोबत झोपला होता. पिस्तूल त्याच खोलीच्या कपाटात ठेवले होते. आईच्या डोक्याखाली ठेवलेली चावी काढून त्याने दोन वाजण्याच्या सुमारास कपाटातून पिस्तूल काढले. पिस्तुलासोबतच मॅगझिन आणि गोळ्याही होत्या...

बहीण ज्या बाजूला झोपली होती त्याच बाजूने गोळी झाडली

त्याने पिस्तूल आईच्या उजव्या बाजूला ठेवले आणि डोळे बंद करून ट्रिगर दाबला. गोळीचा आवाज ऐकून बहीण घाबरून उठली, पण मारेकऱ्याने तिचे तोंड पकडले गोळी झाडताच आईच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. यानंतर तो बहिणीसोबत दुसऱ्या खोलीत गेला आणि या खोलीचा दरवाजा बंद केला.

दुपारी 12 वाजता तडफडून तडफडून आईचा श्वास थांबला

खून झालेल्या मुलाने पोलिसांना सांगितले की, गोळी झाडल्यानंतर आई बेडवर पडून रडू लागली. तिला त्या अवस्थेत सोडून तो बहिणीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. दुसरा शॉट मारायचा नव्हता. त्यामुळे तो आपल्या आईच्या मृत्यूची वाट पाहू लागला. तो दर तासाला खोलीत जाऊन आईला होत असल्या वेदना पाहत होता. पण आईचा जीव वाचवावा असे त्याला एकदाही वाटले नाही.

प्रत्येक वेळी जवळ जाऊन नाकावर हात ठेवून श्वास थांबतो की नाही हे तो पाहत होता. 10 तासांत 8 वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता तो शेवटच्या वेळी गेला तेव्हा आईच्या अंगाची काहीच हालचाल नव्हती. श्वास थांबला होता. तेव्हा मुलाची खात्री पटली की आई आता मेली आहे.

मृतदेह ३ दिवस घरात लपवून ठेवला

आईची हत्या केल्यानंतर मारेकरी मुलाने मृतदेह ३ दिवस घरात ठेवला. पोलिसांनी सांगतात की, ५ जून रोजी सकाळी बहिणीला खोलीत बंद करून तो आईची स्कूटी घेऊन बाहेर गेली. त्याच दिवशी संध्याकाळी मित्राला फोन करून बोलवून घेतलं व बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद करून मित्रासोबत पार्टी केली. मित्राने आईला विचारले असता त्याने सांगितले की ती आजीकडे गेली आहे.

६ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास बहिणीने भूक लागल्याचे सांगितले. यावर तो शेजाऱ्याच्या घरी गेला. म्हणाली आई आजीच्या घरी गेली आहे, मला स्वयंपाक कसा करायचा ते कळत नाही. बहिणीला भूक लागली आहे. शेजाऱ्याने जेवण दिले. त्याला घरी नेले. संध्याकाळी ५ वाजता दुसऱ्या मित्राला फोन केला.

यानंतर मंगळवार, ७ जून रोजी सायंकाळपर्यंत घरात दुर्गंधी पसरली. आता ही घटना लपवणे अवघड आहे असे त्याला वाटले. मग त्यानंतर त्याने साध्याकाळी सातच्या सुमारास वडीलांना फोन करून हत्येची माहिती दिली.

या क्रूर मुलाने आपल्या आईचा जीव घेतला. त्याचं कारण होतं आई मुलाला PUBGI गेम खेळू देत नव्हती. वारंवार PUBGI हा गेम खेळण्यास नकार देत असल्यामुळे त्याच रागातून त्याने आईची गोळी मारून हत्या केली..

Updated : 10 Jun 2022 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top