Home > News > 'चेन्नई की छोरी ते न्यूझीलंडच्या मंत्रीमंडळात भरारी' प्रियंका राधाकृष्णन

'चेन्नई की छोरी ते न्यूझीलंडच्या मंत्रीमंडळात भरारी' प्रियंका राधाकृष्णन

चेन्नई की छोरी ते न्यूझीलंडच्या मंत्रीमंडळात भरारी प्रियंका राधाकृष्णन
X

भारतीय वंशाच्या महिला प्रियंका राधाकृष्णन यांना नुकतेच न्यूझीलंडमध्ये मंत्रीपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. मूळच्या केरळ येथील असलेल्या प्रियंका राधाकृष्णन यांना न्यूझीलंड च्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळात 'सामाजिक वैविध्य, विकास व जनकल्याण' हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे.

प्रियंका केवळ भारतीय वंशाच्या नव्हेत तर त्यांना जन्म चेन्नईचा. आईवडील दोघेही भारतीयच. चेन्नईहून हे कुटुंब सिंगापूरला गेले आणि तिथे शालेय शिक्षण पूर्ण करून प्रियंका वेलिंग्टनमध्ये समाजकार्य पदवी अभ्यासक्रमासाठी न्यूझीलंडला आल्या, तेव्हापासून इथल्याच झाल्या. येत्या शुक्रवारी, ६ नोव्हेंबरला त्या शपथ घेतील.

शिक्षणानंतर प्रियंका यांनी स्वतःला सामाजिक कार्याकरिता वाहून घेतले. घरगुती हिंसाचारात पीडित महिला आणि स्थलांतरित मजुरांची होणारच पिळवणूक याविरोधात त्यांनी आवाज उठवला. २००४ साली लेबर पार्टीच्या सदस्य म्हणून त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. २०१७ साली लेबर पार्टीच्या खासदार म्हणूनही त्या निवडून आल्या. 'इथनिक कम्युनिटी' मंत्रालयाच्या खासगी सचिव म्हणून २०१९ साली त्यांची नियुक्ती झाली. गेल्या वर्षी ओणम सणाला पंतप्रधान जेसिंडा अर्डर यांच्यासोबत त्यांनी लाइव्ह शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर त्या केरळच्या घराघरांत पोचल्या.

नवीन मंत्रिमंडळ शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेईल, त्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक होईल. मंत्रिमंडळ मेरिटनुसार निवडण्यात आले आहे आणि त्यांच्यात लवचिकता आहे, असं अर्डर्न म्हणाल्या. त्याचबरोबर काम न दाखवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा इशाराही अर्डर्न यांनी मंत्र्यांना दिला आहे. दरम्यान, सर्वसाधारण निवडणुकीत जेसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा दणदणीत विजय झाला होता. त्यांच्या पक्षाला ऐतिहासिक बहुमत मिळाले होते

Updated : 3 Nov 2020 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top