Home > News > मुंडे बहीण -भावात श्रेयवादावरुन आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण..

मुंडे बहीण -भावात श्रेयवादावरुन आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण..

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते गेवराई तालुक्यातील 14 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याच शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

मुंडे बहीण -भावात  श्रेयवादावरुन आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण..
X

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मध्ये विकासकामाच्या श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोपाच राजकारण चांगलच तापले आहे. प्रितम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकास कामाचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये असे खडे बोल सुनावले. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना ही सगळी काम मंजूर झाले आहेत कोणी कितीही नारळ फोडा जनता हुशार आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या बीड जिल्ह्यात सध्या, घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादींच्या लोकांनी करू नये सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत असल्याची टीका यावेळी प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

Updated : 18 April 2022 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top