Home > News > प्रितम मुंडेंची राज ठाकरेंवर नाराजी, ''दोन धर्मात दुफळी हे निराशाजनक''

प्रितम मुंडेंची राज ठाकरेंवर नाराजी, ''दोन धर्मात दुफळी हे निराशाजनक''

प्रितम मुंडेंची राज ठाकरेंवर नाराजी, दोन धर्मात दुफळी हे निराशाजनक
X

कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले .असे कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय.

तर राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार असल्याची खंत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलीय.

Updated : 18 April 2022 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top