Home > News > सोन्या चांदीच्या भावात कमालीची घसरण

सोन्या चांदीच्या भावात कमालीची घसरण

सोन्या चांदीच्या भावात कमालीची घसरण
X


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात 351 रुपयांनी घट होऊन सोन्याचा भाव 51,452 प्रति 10 ग्राम वर पोहोचला आहे. एचएफडी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

या अगोदर सोन्याचा भाव 51,803 रुपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या भावात 561 रुपयांची घसरण झाली असून चांदी प्रतिकिलो 68 हजार 182 रुपयांवर पोहोचली आहे. या अगोदर चांदीचे भाव 68 हजार 742 रुपये प्रति किलोग्राम होते.

Updated : 29 March 2022 5:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top