Home > News > Mumbai Rain : अचानक पाऊस आणि मुबईकरांची दैना.. । Maharashtra Mumbai Rain Updates

Mumbai Rain : अचानक पाऊस आणि मुबईकरांची दैना.. । Maharashtra Mumbai Rain Updates

Mumbai Rain : अचानक पाऊस आणि मुबईकरांची दैना.. । Maharashtra Mumbai Rain Updates
X

रात्रभर गर्मीने हैराण झालेल्या मुंबईकरांना (mumbai rain)सकाळी मात्र अचानक पावसाने गाठलं. अचानक पाऊस चालू झाल्यामुळे अनेक मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. राज्यात विविध ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain ) पडतो आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. आज पहाटेपासून मुंबईत सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

आज सकाळपासून मुंबई व उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली असून ठाणे, गोरेगाव, बोरिवली या भागात जोरदार पाऊस सुरू झाला व त्यानंतर दादर, परेल आणि दक्षिण मुंबईच्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. (Mumbai Rain Update) सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्या अनेक मुंबईकरांची तारांबळ उडाली.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हैराण

मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. राज्यातील बुलढाणा, परभणी, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती अशा अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक पिकं काढणीला आले असताना अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे.

पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता.. weather update today

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखीन तीन चार दिवस अवकाळी पावसाची शक्‍यता आहे. याबरोबर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे..

Updated : 21 March 2023 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top