Home > News > प्रतिभाताई पवार यांनी घेतली रोहित पवारांची भेट

प्रतिभाताई पवार यांनी घेतली रोहित पवारांची भेट

प्रतिभाताई पवार यांनी घेतली रोहित पवारांची भेट
X

देशातील राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या देशाची अर्थव्यवस्था ठरवणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. पण दुसरीकडे त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षावर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचे सावट आहे. पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांची केंद्रीय सक्तवसुली संचलनालय (ED)कडून गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या संकटकाळात पवार कुटुंबाची प्रमुख स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिभाताई पवार यांनी पुढाकार घेत रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ED कार्यालया जवळील राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

आज बुधवारी रोहित पवारांना पुन्हा ईडी कारवाईसाठी बोलावण्यात आलं. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावली. विशेष म्हणजे हे कार्यालय ईडी कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे देखील उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांनी या दोघांचेही जोरदार स्वागत केले आणि घोषणाबाजी केली. या घटनेतून पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्षाची एकता आणि ताकतीचे प्रदर्शन दिसले.

रोहित पवारांवर झालेली ईडी कारवाई ही राजकीय बदला घेण्याच्या हेतूने केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्ष करत आहे. त्यामुळे प्रतिभाताईंची ही उपस्थिती ही केवळ रोहित पवारांना पाठिंबा देण्यापुरती मर्यादित नसून, संघर्षाची आणि एकजुटीची भावना व्यक्त करणारी आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष सध्या मोठ्या संकटाला सामोरे आहेत. अशा परिस्थितीत प्रतिभाताई पवार यांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या या रोहित पवारांच्या सोबत उभे राहण्याला पवार कुटुंबाची ताकद आणि विपरीत परिस्थितीशी लढण्याची त्यांची मानसिकता भक्कम असल्याच म्हटल जात आहे. तसेच, येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात निर्माण झालेली फूट बळकट करण्याऐवजी एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे हे देखील यातून दिसून येत आहे.

Updated : 1 Feb 2024 10:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top