Home > News > प्राजक्ता माळीचा 'आईला' सन्मान;अदिती तटकरेंच्या या निर्णयचे केले स्वागत

प्राजक्ता माळीचा 'आईला' सन्मान;अदिती तटकरेंच्या या निर्णयचे केले स्वागत

प्राजक्ता माळीचा आईला सन्मान;अदिती तटकरेंच्या या निर्णयचे केले स्वागत
X

शाहरुख खान अभिनीत ‘स्वदेस’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारलेली प्राजक्ता माळी पुढे ‘हंपी’, ‘पावनखिंड’, ‘लकडाऊन बी पॉझिटीव्ह’आण‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी हिने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना धन्यवाद म्हटलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. चित्रपट, मालिका, वेब सीरिजमध्ये विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासह ती स्वतः एक उद्योजक देखील आहे. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळतेय. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातले अनेक किस्से ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

प्राजक्ताच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर "लेटपोस्ट" असं हॅशटॅग देत ती म्हणते "नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी. काय झालं, अहो हो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही? आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे. हे मी नाही, आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे. आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट? धन्यवाद." असं प्राजक्ताने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

प्राजक्ताच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एकाने लिहिलं, "हे म्हणजे आपल्या आईचा आणि आपल्या मातृशक्तीचा सन्मानच आहे", तर दुसऱ्याने लिहिलं, "देवकी नंदन कृष्ण,कौशल्या पुत्र राम. आपली संस्कृती होती, ती परत आणल्याबद्दल धन्यवाद." अशी कॉमेंट प्राजक्ताच्या पोस्टवर केली आहे. प्राजक्ता माळीचा अभिमानास्पद आहे.

Updated : 8 April 2024 7:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top