Home > News > प्रज्ञा सातव यांनी दिवंगत पती राजीव सातव यांना दिला व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

प्रज्ञा सातव यांनी दिवंगत पती राजीव सातव यांना दिला व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

प्रज्ञा सातव यांनी दिवंगत पती राजीव सातव यांना दिला व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
X

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी ट्विटर वर शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रज्ञा सातव यांनी ट्विटरवर दिवंगत पती राजू सातव यांच्या सोबतचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत त्यांनी राजीव सातव यांच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की,"प्रिय राजीवजी या व्हॅलेंटाईन डे ला आपण जिथे कुठे असाल मला आपल्याला सांगायचे आहे की माझं तुमच्यावर प्रेम होतं माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि यापुढेही कायम राहणार आहे."

गेल्या वर्षी 2021 मध्ये covid-19 च्या दुसऱ्या लाटेत काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत नेते राजीव सातव यांचे निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा राजकारण प्रवेश झाला. काँग्रेसने त्यांना आमदारकी देऊन विधान परिषदेवर धाडलं. प्रज्ञा सातव यांच्या अनेक मुलाखती देखील झाल्या. प्रत्येक मुलाखतीत राजीव सातव यांच्या आठवणीत त्या रमल्या यातूनच उभयतांमध्ये किती प्रेम होत हे दिसून येतं. आणि म्हणूनच हेच प्रेम पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ट्विटरवर आपल्याला पाहायला मिळाल आहे.

Updated : 14 Feb 2022 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top