Home > News > 'आवक वाढल्यास जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता'

'आवक वाढल्यास जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता'

आवक वाढल्यास जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता
X

काल रात्रीपासून मराठवाडा आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे छोटी-मोठी प्रकल्प तुडुंब भरली आहे. तर जायकवाडी धरणात सुरू असलेली आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता असून,जायकवाडी पाटबंधारे विभागाने तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे.

जायकवाडी धरण सद्या 87 टक्के भरले असून,82 हजार 759 क्युसेस ने आवक सुरू आहे. तसेच सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश धरणे हे पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तसेच धरणाच्या निम्न बाजुचे

गोदावरी नदीवरील सर्वच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये सुद्धा 100% च्या जवळपास जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढल्यास संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं आहे.

जायकवाडी धरणात सद्या पाणी पातळी 1519.56 ft (463.162m) असून,जिवंत साठा 1889.451 दलघमी आहे. तर पाणीसाठा 87.03 टक्के आहे. सद्या धरणात 82 हजार 759 क्युसेसने आवक सुरू आहे.

Updated : 28 Sep 2021 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top