कोरोनामुळे देशात लॉकडाउन लावण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही घराबाहे पडता येत नव्हते. सर्व विमान, रेल्वे, बस सेवा बंद होत्या. पण आता सर्वत्र कोरोनाच्या केसेसचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्या असल्यामुळे नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता लोक कामासाठी बाहेर पडत आहेत. पण कुठेही बाहेर जात असताना मग ते विमानतळ, हॉटेल या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक केले आहे. याच त्रासाला कंटाळून लोकप्रिय कॉमेडियन अतुल खत्री यांनी चक्क आपल्या टी शर्ट वर कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले प्रमाणपत्रच छापून घेतला आहे.
वारंवार प्रमाणपत्र दाखवावं लागत म्हणून ही कल्पना तयार केली असल्याचं सांगत त्यांनी आपला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो सोबत त्यांनी 'काम आणि प्रवास पुन्हा सुरू झाला असल्याने विमानतळ, हॉटेल्स इत्यादींवर माझे कोविड प्रमाणपत्र दाखवून कंटाळा आला आहे - ही कल्पना तयार केली.' असे म्हटल आहे.