Home > News > ''काय नाना, तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं..'' त्या व्हिडीओ नंतर चित्रा वाघ यांचे ट्विट

''काय नाना, तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं..'' त्या व्हिडीओ नंतर चित्रा वाघ यांचे ट्विट

काय नाना, तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं.. त्या व्हिडीओ नंतर चित्रा वाघ यांचे ट्विट
X

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा एका महिलेसोबतचा एक व्हिडीओ सध्या अमजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका हॉटेलमध्ये नाना पाटोले व एक महिला दिसत आहेत ती महिला पाटोले यांच्या खांद्यावर डोके ठेऊन बसली आहे आहे असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी ट्विटर वर शेअर करत ''काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं'' असा प्रश्न केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर हा व्हिडीओ एडिट केला असून हे भाजपचे कारस्थान असल्याचं नाना पाटोले यांनी म्हंटल आहे.

नाना पाटोले यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. चित्रा वाघ यांनी देखील हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांच्यावर एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावने कितपत येग्य आहे? असं म्हणत अनेकांनी टीका देखील केली आहे.

या सर्व प्रकारानंतर चित्र वाघ यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पटोले यांचा हा व्हिडीओ फारच धक्कादायक असल्याचं म्हंटल आहे. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी केल्यानंतर त्यांनी जेव्हा एखादी खाजगी गोष्ट पब्लिक मध्ये येते तेव्हा ती खाजगी राहत नाही. जी गोष्ट जोपर्यंत बाहेर येतं नाही तोपर्यंत ती खासगी असते. पटोले यांचा व्हिडीओ आज सकाळपासून व्हायरल होत आहे तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला असल्याचं वाघ यांनी म्हंटल आहे..

Updated : 20 July 2022 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top