Home > News > अखेर बळीराजाचा विजय! मोदींनी तिनही कृषी कायदे घेतले मागे...

अखेर बळीराजाचा विजय! मोदींनी तिनही कृषी कायदे घेतले मागे...

अखेर बळीराजाचा विजय! मोदींनी तिनही कृषी कायदे घेतले मागे...
X

देशात आगामी काळात 5 राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या पाच राज्याच्या निवडणूकांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळं मोदी सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना आपण तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली होती.


यावेळी मोदी यांनी आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. "मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की, आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे." असं म्हणत मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे.

मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे कायदे केले होते. हे कायदे करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र, शेतकऱ्यांचा एक भाग याला सातत्याने विरोध करत असल्याचे पाहून सरकार या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हे कृषीविषयक कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशनही २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.अशी घोषणा मोदींनी केली आहे.


"आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणले,मात्र, आम्ही काही शेतकऱ्यांच्या एका वर्गाला समजून सांगण्यात अपयशी ठरलो."

पंतप्रधानांनी आंदोलक शेतकर्‍यांना त्यांच्या घरी परतण्याचे आणि नवीन सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे.

Updated : 19 Nov 2021 5:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top